शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार? चर्चांना उधाण

shinde - fadanvis

Mumbai –  बाळासाहेबांच्या शिवसेनेचे 40 पैकी 22 बंडखोर आमदार लवकरच भाजपमध्ये सामील होतील, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामध्ये रविवारी केला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर असलेल्या रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकलं आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.

Total
0
Shares
Previous Post
विराट कोहली

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या खास विजयानंतर कोहलीने चाहत्यांसाठी लिहला खास संदेश

Next Post
घुबड

जाणून घ्या दिवाळीत घुबड चर्चेत का राहते?

Related Posts
ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

मुंबई – बँक कर्ज फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने व्हिडिओकॉनचे मालक…
Read More

सोलापूर जिल्ह्यात ‘या’ योजनेचा झाला तब्बल 57 हजार 80 रुग्णांना झाला लाभ

सोलापूर :- गोरगरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांना आजारपणात उपचारासाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार सेवा मिळावी तसेच रुग्णांना आर्थिक…
Read More