राज्यपाल व भाजप मिळून घटनेचे उल्लंघन करत आहेत; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. त्यामुळे  सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव या एकमेव उद्देशासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे असं राज्यापालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले होते. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने प्रथमच या राजकीय लढाईत उडी घेतल्याचं दिसून आलं.

 

दरम्यान, राज्यपाल व भाजप मिळून घटनेचे उल्लंघन (Incident violation) करत ( Maharashtra political crisis ) आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन, न्यायाची मागणी करणार आहोत. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. राफेलपेक्षा हा वेग कमी होईल, अशा वेगाने निर्णय घेतले आहेत. राज्यपालांचा आदर आहे. त्यांच्यावरही कुणाचाही दबाव असू ( Sanjay Raut on Floor Test ) शकतो, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.