एक हात मदतीचा,आपल्या किरीट भाऊला ; युवक राष्ट्रवादीचे अनोख आंदोलन

मुंबई – लोकशाही न्यूज चैनलवर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ (Offensive video of former MP Kirit Somaiya) प्रसारित करण्यात आला होता. या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक हात मदतीचा आपल्या किरीट भाऊला या अनोख्या आंदोलनाच्या मार्फत निषेध करण्यात आला आहे. हे आंदोलन मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई अध्यक्ष ॲड निलेश भोसले यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयासमोर करण्यात आले आहे.

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्हत नग्न व्हिडिओ न्यूज चैनल वर दाखवण्यात येत आहे. त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने कपडे विकत घेऊ शकत नाही असे लक्षात येते. असल्याने आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमय्या यांना कपडे पोस्ट आधारे पाठवण्यात आले आहे तसेच त्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन देखील राष्ट्रवादी युवक प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई अध्यक्ष ॲड निलेश भोसले यांनी म्हटले की भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्हत नग्न व्हिडिओ कालपासून न्यूज चैनल वर दाखवण्यात येत आहे तसेच तो व्हिडिओ वायरल होत आहे हा व्हिडिओ खरा की खोटा तपासणे पोलीस यंत्रणेचे काम आहे. परंतु महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे व संस्कृती प्रधान राज्य आहे. ह्या राज्यात कोणीही नग्न राहू नये म्हणून मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने भाजप नेते किरीट भाऊ ला एक हात मदतीचा उपक्रमा अंतर्गत कपडे व अंतर वस्त्र भेट पाठवण्यात येत आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

या अनोख्या आंदोलन मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई अध्यक्ष ॲड निलेश भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शाहरुख शाह, सचिन नारकर, इरफान दिवटे, हरीश गायकवाड, मेहुल जाधव मुंबई उपाध्यक्ष (प्रशासन) अमित हिंदलेकर, तालुकाध्यक्ष संतोष पवार, अनिकेत मंडळू, राहुल साळवे, आकाश गुप्ता संतोष रसाळ , राजू थोरात, नावेद शेख, ऋषिकेश सिंह यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.