आधी मैत्री, मग काढले फोटो! पुण्यातील माजी नगरसेविकेला धमकावून मित्राने केला अत्याचार

Pune Crime News : पुण्यासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून एकीकडे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे. याचवेळी पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या(PMC) माजी नगरसेविकेवर बलात्कार (Former corporator of Pune Municipal Corporation (PMC) raped) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मैत्रीपूर्ण संबंधांमधून संबंधित पीडित माजी नगरसेविकेबरोबर काढलेले फोटो दाखवून धमकावण्यात आलं. या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पर्वती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) (Sachin Machindra Kakade) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काकडे आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्री संबंध होते. समाजमाध्यमात छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी काकडे याने तिला दिली. त्यानंतर त्याने धमकावून नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला (Pune Rape Case). सन २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे याने अत्याचार केले होते. माजी नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळले. त्यानंतर काकडे नगरसेविकेला धमकावत होता. पतीला मैत्रीसंबंधाबाबत माहिती देतो, असे सांगून तिच्याकडून आणखी पैशांची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी काकडे तिच्या घरी आला. तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे (Sub-Inspector of Police Sachin Nikalje) तपास करत आहेत.(Former corporator Rape Case latest update).

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole