चारचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका, आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Number Plate

पुणे : खाजगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरीता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास नागरिकांना तो विहित शुल्क भरुन सुलभतेने तो मिळावा यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 दुपारी 3.30 वा. पर्यंत कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. डीडी ‘आर.टी.ओ. पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवाअनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील.

अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या (वीज देयक, दूरध्वनी देयक आदी) पुराव्याची आणि ओळखीसाठीच्या (आधार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड आदींपैकी एक) छायाचित्र ओळखपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.

एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास अर्जदारांची यादी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावाकरीता जास्त रक्कमेचा एकच डीडी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. डीडी किमान 301 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा तसेच ‘आर.टी.ओ. पुणे’ यांच्या नावे असावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार सभागृहात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडण्यात येतील. एका पसंतीक्रमासाठी जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास संबंधित पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.

आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीच्या प्राधिकारपत्राचा नमुना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. कार्यालयामध्ये येणाऱ्या सर्व अर्जदारांनी कोव्हिड-19 च्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

Previous Post
nana patole

राज्यभरात कडकडीत बंद, महाविकास आघाडीच्या बंदला नागरिकांचा प्रचंड पाठिंबा – नाना पटोले

Next Post
tuljabhavani temple tuljapur

‘खंडेनवमीला तुळजापूर येथे होणारी अजबळी प्रथा थांबवा’

Related Posts
महाराष्ट्रभर निघणार लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा!

महाराष्ट्रभर निघणार लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा!

पुणे : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे…
Read More
जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय, तर जम्मू-काश्मीर आणि अयोध्येत उबारण्यात येणार महाराष्ट्र भवन- Ajit Pawar

जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय, तर जम्मू-काश्मीर आणि अयोध्येत उभारण्यात येणार महाराष्ट्र भवन- Ajit Pawar

Interim Budget, Ajit Pawar: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित…
Read More
Nana Patekar | अभिनेते नाना पाटेकर कारगिल युद्धात लढले होते, खुलासा करताना म्हणाले, 'देशासाठी एवढं तरी करू शकतो'

Nana Patekar | अभिनेते नाना पाटेकर कारगिल युद्धात लढले होते, खुलासा करताना म्हणाले, ‘देशासाठी एवढं तरी करू शकतो’

अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) 46 वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक संस्मरणीय आणि दमदार भूमिका…
Read More