Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री व पती अजित पवार (Ajit Pawar) स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्नी सुनेत्राच्या प्रचाराची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ते सातत्याने बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. यादरम्यान सुनेत्रा पवारांनी विजयी केल्यास मला त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम करावे लागणार आहे, अन्यथा माझे काही खरं नाही, असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले.

अजित पवार (Ajit Pawar) मंगळवारी रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात होते. यावेळी ते म्हणाले, सुनेत्रा पवार खासदार झाल्याचा तुम्हाला फायदा आहे. त्यांच्या माध्यमातून माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकारचा निधी असणार आहे. ही सर्व माझी पण जबाबदारी आहे. उद्या बायकोने घरी म्हटले, हे काम करुन द्या, तर मला ते करुन द्यावेच लागणार आहे. नाहीतर माझे काही खरे नाही, अजित पवार यांच्या या मिश्कील वक्तव्यानंतर चांगलेच हास्य पसरले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा