भाजपने पुण्यात भाकरी फिरवली : धीरज घाटे आणि शंकर जगताप यांच्यावर नवी जबाबदारी

पुणे – भारतीय जनता पार्टी पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहराच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहराच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची निवड करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (shankar jagtap) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केल्या आहेत.

धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.  दुसरीकडे भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचाबळ शहराध्यक्षचा कालावधी संपल्यानंतर शहराची धुरा आता शंकर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आहेत. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यानंतर शंकर जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आमदारपदासाठी भाजपचा खरा चेहरा म्हणून शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा होती. आता शंकर जगताप यांच्यावर शहराध्यपद सोपवण्यात आलं आहे.