एका व्हिडीओमुळे कोण संपत नसतो; सोमय्या प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना राणेंनी झापलं 

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला आहे. ‘लोकशाही मराठी’वर सोमय्या यांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. व्हिडिओत सोमय्या हे व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत घाणेरडे दिसत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरीही या व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.

दुसऱ्या बाजूला भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी याच मुद्द्यावर भाष्य करत विरोधकांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले,  उद्धव ठाकरे गटाला आणि काही प्रमाणात अजित पवार गटाला असं वाटतय की राज्यभर आंदोलन करून ते किरीट सोमय्याला संपवतील. एका व्हिडिओमुळे कोण संपत नसतो म्हणून किरीट सोमय्या येणाऱ्या काळात ठाकरे गटासाठी भयानक ठरेल ही आम्हाला खात्री आहे. काही दिवस थांबा, कळेल संपला कोण… असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.