पती हाच परमेश्वर! नवऱ्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी महिलेने कपाळावर गोंदवून घेतला टॅटू

आजही लोकांमध्ये टॅटूची मोठी क्रेझ आहे. लोक आपल्या प्रियजनांच्या नावाचे टॅटू, आवडत्या सेलिब्रिटी किंवा क्रिकेटरचे टॅटू काढत असतात. साधारणपणे लोक हातांवर, पायांवर किंवा मानेवर टॅटू गोंदवले जातात. कोणीही स्वत:च्या कपाळावर टॅटू गोंदवून घेत नाही. पण बंगळूरुमधील एका महिलेने जोडीदारावर आपण किती प्रेम करतो हे सांगण्यासाठी कपाळावर त्याच्या नावाचा टॅटू बनवून घेण्याचा निर्णय घेतला. या आगळ्या-वेगळ्या टॅटूमुळे सोशल मीडियावर या महिलेचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये टॅटू आर्टिस्ट या महिलेच्या कपाळावर टॅटू काढत असल्याचे पाहायला मिळते. तो सुरुवातीला तिच्या पार्टनरच्या नावाचे स्टेन्सिल लावतो आणि पुढे मशीनचा वापर करुन त्यावर टॅटू काढायला लागतो. (Women tattooed husband name on Forehead)

कपाळावर टॅटू गोंदवणून घेणाऱ्या या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओला २,५०,००० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘टॅटू काढल्यावर घटस्फोट झाला तर..’ असे गमतीने म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘म्हणून शिक्षण गरजेचं असतं’ अशी कमेंट केली आहे. बऱ्याच जणांनी हा टॅटू खोटा आहे असेही म्हटले आहे. या व्हिडीओनंतर पोस्ट केलेल्या अन्य व्हिडीओमध्ये या महिलेच्या कपाळवर टॅटू दिसत नसल्याचे तो टॅटू पर्मनंट नसल्याचे लक्षात येते.