किशोर आवारेंची किती लाखांची दिली होती सुपारी? धक्कादायक माहिती आली समोर 

पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची नुकतीच दिवसाढवळ्या हत्या (Murder of Kishore Aware) करण्यात आली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली, हे आता समोर आलं आहे. त्यांची हत्या करण्यासाठी आरोपींना माजी नगरसेवक भानू खळदेंनी 50 ते 60 लाखांची सुपारी दिल्याचं समजत आहे. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाईल, अशी बोलणी झाल्याचं सांगत आरोपींनी माजी नगरसेवक भानू खळदेंचा भांडाफोड केला आहे.

मुलगा गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने दहा लाख रुपये दिलेत. हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून लागेल तेव्हा देण्यात आल्याचंदेखील तपासात समोर आलं आहे. याशिवाय भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.एबीपीने याबाबत वृत्त दिले आहे.