Bhalchandra Nemade: वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा? नेमाडे पुन्हा बरळले

Bhalchandra Nemade: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. नुकताच जळगाव येथील भाषणात त्यांनी प्रभू रामचंद्रांबाबत जो उल्लेख केला आहे त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. वाल्मिकींनी लिहिलेलं रामायणच खरं हे कसं काय मान्य करायचं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत त्यांनी पुन्हा एकदा चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे.

“रामाचं बदलत गेलेलं रुप प्रत्येक रामायणांत आहे. वाल्मिकींच्या काळात आपल्याला आत्ता आहे तसं ते रुप दिसतं. शुंगांना आवडेल असं वाल्मिकी लिहित असत. मग वाल्मिकींचा राम खरा कसा काय? शुंगांच्या दरबारी वाल्मिकी कवी होते. आसाम मधल्या करवी लोकांच्या रामायणात सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करते, प्रसंगी शिव्याही देते, तुला अक्कल नाही वगैरे म्हणते. हे सगळं रामायण मराठीसह सगळ्या भाषांमध्ये आलं पाहिजे. अनेक प्रकारची रामायणं आहेत हे आपल्याला ठाऊक झालं पाहिजे. ‘300 रामायणाज’ हे पुस्तक का वाचू देत नाही? त्यावर बंदी का घातली आहे?” असाही प्रश्न नेमाडे यांनी विचारला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

“लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. राम मांसाहारी होता की शाकाहारी? हे वाचन केलं की लक्षात येतं. कशासाठी त्याची चर्चा करायची? जे खरं आहे त्याचा शोध घ्या म्हणजे समजेल. फक्त टीव्ही, भाषणं, चर्चा यातून सत्य कळणार नाही. एकच रामायण आहे का? अनेक युगांपासून रामायण लिहिलं गेलं आहे. रामानुजन यांचं ‘300 रामायणाज’ या पुस्तकात अनेक उल्लेख आहेत. चंगेझ खानला रामायण आवडत होतं. ब्रिटिश संग्रहालयात मी ते पाहिलं आहे. त्याच्यातला राम वेगळा आहे. कंबोडियातला राम वेगळा आहे. जैन रामायणातला राम वेगळा आहे. काही ठिकाणी राम आणि सीता बहीण भाऊ आहेत. काही ठिकाणी सीता रावणाची मुलगी आहे.” असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर