NIA ची मोठी कारवाई;  44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

NIA Raids in Karnataka and Maharashtra: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) शनिवारी (9 डिसेंबर) सकाळपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे 44 ठिकाणी छापे टाकत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या माध्यमातून देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. ISIS ही जगातील सर्वात भयानक दहशतवादी संघटना म्हणून गणली जाते.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपासून एनआयएचे छापे 44 ठिकाणी आहेत. त्यापैकी कर्नाटकात एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये एका ठिकाणी छापे टाकले आहेत. भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए व्यापक तपास करत आहे. यापूर्वीही असे छापे टाकण्यात आले असून त्यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.

इंडिया टुडे या संकेतस्थळाने एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाळे आणि इसिसच्या हस्तकांशी संबंधाचा कट यानिमित्ताने उघड होणार आहे. भारतात इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी गुंतलेल्या एका मास्टरमाईंडचा या जाळ्यात समावेश होता. भारतीय भूमीत दहशतवादी करण्याचा कट या नेटवर्कने रचला होता, असेही सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम