Pune : पार्टीसाठी गेलेला शाहनवाज परत आलाच नाही; पुण्यातील घटनेनं खळबळ

Pune Crime News – त्या दिवशी शाहनवाज मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता…सद्दाम, साहिल आणि नुमन या त्याच्या मित्रांनी त्याला पार्टीसाठी म्हणून नेलं होतं..नेहमीचेच मित्र म्हणून शाहनवाजनेही त्यांच्यावर विश्वास ठेवला.. मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही..दुसऱ्या दिवशी रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.. शाहनवाजसोबत नेमकं काय झालं? त्याचा खून कोणी केला? पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती समोर आली..या प्रकरणात नेमकं काय झालं हे आपण आज जाणून घेणार आहोत.

कोंढव्यातील पारसी मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली.. त्याच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून मयत व्यक्ती हा शहानवाज मुनीर सय्यद उर्फ बबलू असल्याचे समोर आले.. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवातही केली.. तपास सुरू असतानाच पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की पिसोळी परिसरातील एका बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती लपून बसला असून त्याने गुन्हा केला असण्याची शक्यता आहे.. त्यानंतर कोंढवा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.. त्याच्याकडे केलेल्या चौकशीअंती आणि तांत्रिक तपासानंतर त्यानेच शहानवाजचा खून केल्याची कबुली दिली..

नुमन जावेद खान, सद्दाम शेख, साहिल शेख आणि शहानवाज चांगले मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी आरोपींनी शहानवाज करून पैसे घेतले होते.. शहानवाज याने क्रेडिट कार्डवर लिहून घेत आरोपींना पैसे दिले होते. मात्र उसने घेतलेल्या या पैशावरून त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.. शहानवाजच्या रोजच्या कटकटीला कंटाळलेल्या आरोपींनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. पार्टी करण्यासाठी जाऊयात म्हणून त्याला सोबत नेले.. आणि त्याचा खून केला.

खून केल्यानंतर आरोपींनी रक्ताने माखलेल्या कपड्यांची विल्हेवाट लावली.. मृतदेह तसाच जागेवर सोडून दिला.. आणि काही घडलेच नाही या अविर्भावात वावरत होते.. इतकच नाही तर आरोपी शहानवाज याच्या घरी देखील जाऊन आले होते.. मात्र एक पुरावा देखील पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसा असतो.. या गुन्ह्यातही तसच घडलं.. क्रेडिट कार्ड वरून लोन घेतल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आणि त्यानंतर अवघ्या दहा तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki