अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

Aanand Paranjape- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यामागे नेहमीच सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले पण जितेंद्र आव्हाड यांनी कायमच अजित पवारांचा तिरस्कार, दुस्वास, व्देष केला आहे असे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री अजितदादांचे चित्र ट्विट केले होते. तेव्हा ते त्यांनी कोणत्या अवस्थेत केले होते हे माहित नाही. पण आज त्यांनी अजितदादांना लवासा प्रकरणी, सिंचनप्रकरणी डिफेंड केल्याचा दावा केला आणि आपण कोणावरही व्यक्तीगत टीका करत नाही असे म्हटले. मुळात जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे होते. टीव्ही चॅनलवर आपला टीआरपी वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. परंतु अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना २००९ ते २०१४ साली आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला यामुळेच आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली आहेत. विनयभंगाच्या केसमध्ये आव्हाड हे खचले असताना त्यांच्या घरी साडेतीन तास अजितदादा त्यांना धीर देत बसले होते, पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून अजितदादांनी पोलिसांना झापले होते. आव्हाड हे तेव्हा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते. यावेळी धीर देऊन अजितदादांनी त्यांना सावरले होते. अजितदादा हे नेहमी आव्हाड यांच्या मागे सह्यादीसारखे ठाम उभे राहिले. पण आव्हाड यांनी कायमच अजितदादांचा तिरस्कार करत आले. अजितदादांविरोधात आम्हांला आंदोलन करायला लावले. आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तोंड कोंबडीच्या कोणत्या भागासारखे दिसते अशी टीका केली होती तर उपसभापती निलमताई गोऱ्हे या राजकारणात किती साड्या बदलतात, अशी टीका केली आहे तर पंकजाताई मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करताना चिक्की खाताना आव्हाड यांनी केलेले बिबस्त तोंड सर्वांनी पाहिले आहे. किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संडासातील पैसे खाल्ले अशाप्रकारची व्यक्तीगत टीका आव्हाड यांनी नेहमीच केली आहे. पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात, असे आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास