बादशाह अडचणीत, अश्लील गाण्यात जोडलं ‘भोलेनाथ’चं नाव; महाकालच्या पुजाऱ्यांनी दिली चेतावणी

उज्जैन- प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या (Rapper Badshah) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनक’ (Badshah Sanak Song) अल्बमचे गाणे वादाचा विषय बनले आहे. महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावासह अश्लिल शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यांनी गाण्यातून देवाचे नाव काढून माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास बादशाहविरोधात उज्जैनसह अन्य शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

महाकाल मंदिराचे ज्येष्ठ पुजारी महेश पुजारी यांनी हिंदू सनातनमध्ये या सवलतीचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. अशा सर्व गोष्टींवर संत आणि कथाकार मौन बाळगून आहेत. चित्रपट स्टार असो वा गायक, त्यांना देवाच्या नावाने अश्लीलता पसरवण्याचा अधिकार नाही. त्यांच्यावर देशभरात एकाच वेळी कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारे सर्वजण सनातन धर्माचे चुकीचे वर्णन करत राहतील, त्याला आमचा विरोध आहे. महाकाल सेना आणि पुजारी महासंघासह हिंदू संघटनांनी तात्काळ या गाण्यातून भगवान भोलेनाथांचे नाव हटवण्यास सांगितले आहे.

बादशहाने शिवभक्तांची माफी मागावी
उज्जैनचे रहिवासी ऋषभ यादव म्हणाले की, प्रसिद्ध गायक बादशाहचे गाणे सध्या खूप वाजत आहे. आम्ही शिवभक्त आहोत, ज्या गाण्यात भोलेनाथच्या नावाचा उल्लेख आहे, त्या गाण्यात अश्लिलता दाखवली जात आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. सोशल मीडियावरून हे गाणे तात्काळ हटवा आणि बादशाहने सर्व शिवभक्तांची माफी मागावी, अन्यथा २४ तासांत एफआयआर दाखल करण्यात येईल.