‘नाद नाही करायचा, राज्यात आता…’, अफजलखानाच्या कबरीजवळील बांधकामावर कारवाई करताच नितेश राणेंचं ट्वीट

पुणे – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीच्या भोवतीचं बांधकाम हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय बनला होता. याच अनधिकृत बांधकामावर सरकारनं हातोडा मारला आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता. त्याच शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत कबरीभोवतीच्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सरकारचा हा सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike On Afzal Khan Tomb) मानला जातोय.

दरम्यान, दरम्यान भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या कारवाईवरुन आनंद व्यक्त केला असून ‘नाद करायचा नाही’ अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. “अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवले!!! महाराष्ट्रात हिंदुत्वादी सरकार आहे. नाद नाही करायचा,” असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

 

दुसऱ्या बाजूला प्रतापगडाच्या पायथ्याला अफझल खानाच्या कबरी भोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला एक प्रश्न सुटला. अफजलखानाचा वधाच्या म्हणजेच ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास घेतले, या निर्णयाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईचे स्वागत करून त्यांनी सरकारचे अभिनंदनही केले.