महाराष्ट्रात सरकार बदल झाल्यास साधारणपणे असे असू शकेल नवे मंत्रीमंडळ 

मुंबई – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर (Thackeray Gov) संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. शिंदे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करू शकते, अशी चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने सरकार स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतील. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद (Deputy Chief Minister) एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. शिंदे गटातील 11 आमदारांना कॅबिनेट आणि 3 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 16 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांसह एकूण 29 आमदार भाजपचे मंत्री होऊ शकतात.

हे आमदार भाजपमधून कॅबिनेट मंत्री होऊ शकतात

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मदन येरावार, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, सुभाष देशमुख/विजय देशमुख, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील,महेश लांडगे, राम शिंदे.

राज्यमंत्री – 

राहुल कुल, जयकुमार गोरे किंवा शिवेंद्रराजे, राम सातपुते किंवा रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अतुल सावे, योगेश सागर, नितेश राणे, संदीप धुर्वे, रणजित सावरकर, देवयानी फरांदे, राणा जगजित सिंग, मेघना बोर्डीकर.माधुरी मिसाळ.

शिंदे गट –

भरत गोगावले, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत यांना मंत्री केले जाऊ शकते. तर संदिपान भुमरे, संजय शिरसाट यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते.