राज्यात अस्थिर वातावरण करण्याचा डाव ; मात्र महाविकास आघाडी भक्कम आहे – थोरात

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या (Residence of Chief Minister Uddhav Thackeray Matoshree) बाहेर हनुमान चालीसा (Hanumaan Chalisa) पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आज दिवसभर नवनीत राणा यांच्या खारमधील (Khar) इमारतीबाहेर शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दोन्ही बाजूने एकमेकांना आव्हानं दिली जात असताना आता राणा दाम्पत्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आम्ही आमचे आंदोलन संपवत असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा दौरा असल्याने कायदा सुव्यस्थेचा (Law and order) प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या (West Bengal) दिशेने सुरु असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

दरम्यान, या घोषणेनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला असून राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्यातील वातावरण मुद्दाम खराब केले जात असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Senior Congress leader Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली आहे. राज्यात अस्थिर वातावरण करण्याचा डाव आहे. राज्यात सर्व ठीक आहे, पण भाजप राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण मुद्दाम केला जात आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे, गोंधळ वातावरण मुद्दाम निर्माण केले जात आहे, असे थोरात म्हणाले.