चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरु होणार – नितेश राणे 

Mumbai – मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) धोक्यात आले आहे. यातच  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असं सूचक ट्विट संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. राऊतांनी केलेलं हे वक्तव्य नेमकं कुणाला सूचना देतंय. एक तर सरकार बरखास्तीसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मनाची तयारी करावी की सरकारमध्ये असलेल्या इतर आमदारांसाठी हा इशारा आहे ? चर्चा अनेक अंगांनी सुरु आहेत.

दरम्यान,  भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांना याच वक्तव्यावरून सुनावलं आहे. निवडणुका होणार, असं सांगून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आमदारांना घाबरवत आहेत. धमक्या देत आहेत, असा पलटवार नितेश राणेंनी केलाय.  महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने, असं सूचक ट्विट संजय राऊत यांनी केल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना प्रतिक्रिया दिलीय.

ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, संजय राऊत यांना संविधान (Constitution) आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय ? सरकार वाचविण्यासाठी ? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरु होणार ! असं राणे यांनी म्हटले आहे.