यशवंत जाधवांनी वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव पुढे केले ? 

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. याच डायरीतील एक उल्लेख राज्यभरात सध्या चर्चिला जात आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर आता शिवसेनाला सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.

दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यानतंर महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.“हद्द कर दी…यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे….वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख…जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??,” असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.