संतापजनक : नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराचा धर्मांधांनी गळा कापला

उदयपूर – राजस्थानमधील उदयपूरमध्ये भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट (Post on social media) शेअर करणाऱ्या तरुणाची आज निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण मालदास स्ट्रीट परिसरातील आहे. एसपी उदयपूर मनोज कुमार यांनी सांगितले की, काही आरोपींची ओळख पटली आहे. आम्ही पथके पाठवली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओही आम्ही पाहिला आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीच वाजता रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद (Riaz Akhtar and Gauss Mohammed)  नावाचे आरोपी तलवारी आणि चाकू घेऊन त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी भरदिवसा गळा चिरून कन्हैयालाल तेली  यांची हत्या केली(Murder of Kanhaiyalal Teli). हल्लेखोरांनी या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही बनवला आहे. एवढेच नाही तर आरोपीने घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी घेतली.या घटनेच्या विरोधात उदयपूरमध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली आहेत. कन्हैयालालच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

उदयपूर हत्याकांडानंतर लोकांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. या घटनेनंतर मालदास बाजारातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, मी उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करून कोणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.