ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी; राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे राज राजापूरकर यांची मागणी

Raj Rajapurkar: राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की तटकरे साहेबांनी जी टीका केली. ती अतिशय अयोग्य आहे. तटकरे यांनी समग्र नावाचा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथामध्ये तटकरे यांनी असे म्हटलं आहे की शरद पवार साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली. माझं म्हण्याचं उद्दिष्ट हे आहे की जर तुम्ही क्षुद्र आहात म्हणून टीका केली जाते तर तुम्ही जे पुस्तकात लिहिलं आहे ते खोटं आहे की? आज बोलता आहेत हे खोटं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. असे पत्रकार परिषदेत बोलताना विचारल आहे.

राज राजापूरकर म्हणाले की, तटकरे यांचा समाज गवळी समाज अतिशय कमी आहे. ते जेथून निवडून येतात तिथे चवदार तळ आहे. बाबासाहेबांनी तिथे क्रांती घडवली तटकरे तुम्ही कधी ते पाणी चाखलं आहे का ? असा प्रश्न राज राजापूरकर यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी हीच आमची भूमिका आहे.

राज राजापूरकर म्हणाले की, आज मी येथे हरी नरके यांची माफी मागतो आज छगन भुजबळ, फडणवीस साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाची ज्या पद्धतीने फसवणूक केली आहे. जनगणनेचा जो डेटा होता तो लपवून ठेवण्यात आला. या सर्व गोष्टींचा खुलासा हरी नरके यांच्यामार्फत झाला होता. परंतु आज त्यांचे सहकारी छगन भुजबळ हे फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहे. खरच तुम्ही ओबीसी समाजाचे नेते असाल तर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करावी किंवा सरकार मधून बाहेर पडावं असेही राज राजापूरकर म्हणाले.

राज राजापूरकर म्हणाले की, ओबीसी समाजाने दंगे दहशत माजवासी वक्तव्य करू नये. जातीनिहायवाद निर्माण करून असंतोष माजवू नये असं यावेळी राज राजापूरकर म्हणाले. जोपर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना होत नाही. तोपर्यंत अनेक प्रश्न मार्गी लागणार नाहीत. जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा योजनेचा विषय देखील मार्गी लागणार नसल्याचं राज राजापूरकर म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील जातीनिहाय जनगणनेच्या मार्गानेच मार्गी लागणार आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांनी सत्तेत असताना तुम्ही हे प्रश्न मार्गी लावावेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे हा प्रस्ताव मांडावा आणि याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे राज राजापूरकर म्हणाले.

राज राजापूरकर म्हणाले की, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल १० तारखेला ३६ जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जातीनिहाय जनगणनेचे निवेदन देणार असून पंधरा दिवसानंतर राज्यपाल रमेश बैस यांची देखील भेट घेणार आहे. तरी ही मार्ग निघणार नाही तर आम्हाला नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळी हजारोच्या संख्येने एकत्र येऊन आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याचं राज राजापूरकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट – मंत्री छगन भुजबळ

इच्छुकांनो होशियार : आगामी महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर!

शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला- आज जे काही झालं ते…