शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला- आज जे काही झालं ते…

Gautam Gambhir On Angelo Mathews: बांगलादेशविरुद्ध अँजेलो मॅथ्यूजला ज्या पद्धतीने बाद करण्यात आले त्यावरून गदारोळ सुरुच आहे.  श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट घोषित करण्यात आले. मात्र, आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने ट्विट करून लिहिले की, ‘दिल्लीत आज जे काही घडले ते निराशाजनक आहे.’ गौतम गंभीरशिवाय अनेक दिग्गजांनी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनवर (Shakib Al Hasan) टीका केली.

गौतम गंभीर, उस्मान ख्वाजा आणि मायकेल वॉन सारख्या दिग्गजांचा असा विश्वास आहे की बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने खेळाच्या भावनेविरुद्ध कृती केली आणि ते क्रिकेटसाठी चांगले नाही. अँजेलो मॅथ्यूज सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत असतो. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) लिहितो की जेव्हा अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर पोहोचला तेव्हा त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला, तो टाइम आऊट कसा झाला ? जर तो त्याच्या क्रीजवर आला नाही तर मी पूर्णपणे टाईम आऊटच्या बाजूने आहे पण हे हास्यास्पद आहे. याशिवाय इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने लिहिले की, ‘हेल्मेटच्या समस्येमुळे वेळ संपला… ही एक वेगळ्या प्रकारची समस्या आहे.’

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण