ही राजकीय लढाई असून याला जाती-धर्माचा रंग…; नसीम सिद्दिकींनी केला तटकरेंच्या वक्तव्याचा निषेध

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी यांची पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये नसीम सिद्दिकी यांनी जून महिन्यात राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या बद्दल वक्तव्य करत अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं. तसेच पक्ष सोडून गेलेले सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलं की मी क्षुद्र असल्याने आम्हाला सुप्रिया टारगेट करतात त्यांचं हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे असे नसीम सिद्दिकी म्हणाले.

नसीम सिद्दिकी म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून गेले त्या मुद्द्याविषयी सध्या संसदेत आणि निवडणूक आयोगात सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सुप्रियाताई सुळे आमच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांपैकी सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यांचं सदस्यत्व रद्द करावे हे पत्र सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना दिल आहे. सुप्रियाताई सुळे यांच्यावर करण्यात आलेली टिका ही अतिशय निंदनीय आहे.

नसीम सिद्दिकी म्हणाले की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तटकरे यांना सर्व काही मिळालं खासदारकी, पक्षाचं सदस्यत्व त्यांची मुलगी देखील आज आमदार आहे. २२-२३ ते मंत्री देखील होते. त्यांचा भाऊ त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा देखील आज आमदार आहे. शरद पवार साहेबांनी १९९९ नंतर राष्ट्रवादी पक्ष वाढवला.आणि या लोकांना शरद पवार यांनी अनेक मोठमोठ्या संध्या दिल्या. जे जे जमिनीवर होते आज त्यांना मोठे केलं हे सर्व शरद पवार यांनी केलं. आणि आज हेच लोक म्हणतात की आम्ही शूद्र असल्यामुळे टार्गेट केलं जातं याचा आम्ही सर्वे शरद पवार गटामधील नेते निषेध करत आहोत. ही राजकीय लढाई असून याला जाती-धर्माचा रंग देणे अतिशय चुकीचं असल्याचं नसीम सिद्दिकी म्हणाले.

आता हे सर्वांनाच माहिती आहे की कोणाच्या मागे ईडी आणि कोणाच्या मागे इन्कम टॅक्स आहे त्यामुळे हे सर्व लोक पक्ष सोडून गेले आहेत सुप्रियाताई सुळे यांनी अपात्रता कारवाई व्हावी यासाठी पत्र दिलं म्हणून तुम्ही असे आरोप लावत असल्याचं तटकरे म्हणाले आणि हे सर्व चुकीचे असून राष्ट्रवादी प्रवक्ता म्हणून मी या वक्तव्याचा निषेध करतो शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार पाळणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे आहेत असेही नसीम सिद्दीकी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट – मंत्री छगन भुजबळ

इच्छुकांनो होशियार : आगामी महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर!

शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला- आज जे काही झालं ते…