न्यूझीलंडविरुद्ध सेमी फायनल जिंकण्यासाठी भारताला ‘या’ गोष्टीची गरज, भारतीय क्रिकेटरचा खुलासा

IND vs NZ Semi Final: भारतीय संघाने (Team Inhdia) रविवारी विश्वचषक 2023 च्या (World Cup 2023) 45 व्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा स्पर्धेतील हा सलग 9वा विजय ठरला. भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने चालू स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.

भारतीय संघ आता उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी भिडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कुलदीप यादव(Kuldeep Yadav) म्हणाला की, उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडच्या लवकर विकेट घ्याव्या लागतील.

काय म्हणाला कुलदीप यादव?
वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजी करणे अवघड आहे. बाऊन्स चांगला असून येथे फलंदाजांचे वर्चस्व आहे. मात्र, वनडे फॉरमॅटमध्ये गोलंदाजांकडे पुनरागमन करण्याची वेळ आहे. पण हो, खेळात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी तुम्हाला लवकर विकेट्सची आवश्यकता असेल, तरच तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकाल.

भारतीय संघाची तयारी चांगली आहे
कुलदीप यादवने असेही सांगितले की, भारताची तयारी चांगली असून 2023 च्या विश्वचषकात त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने साखळी टप्प्यातील आपले सर्व 9 सामने जिंकले आणि विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

न्यूझीलंड विरुद्ध 2019 विश्वचषक उपांत्य फेरी चार वर्षांपूर्वी झाली होती. यानंतर आम्ही अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या. भारतातील परिस्थिती आम्हाला माहीत आहे आणि न्यूझीलंडलाही. आमची तयारी चांगली होती आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करू शकलो. पुढच्या सामन्यातही हीच लय कायम राहील, अशी आशा आहे.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत