देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार

Sharad Pawar: आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येथील स्वाभिमानी सभेत बोलताना म्हणाले की, राज्यात यावर्षी मागील वर्षाच्या तुलनात पाऊस कमी झाला असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. शेतकरी अडचणीत आहे या अडचणी मधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे मात्र असं होताना दिसत नाही आहे यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने करावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव येथील स्वाभिमानी सभेत बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले आज ज्या भाजप वाल्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सूत्रे आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या दु:खाबद्दल यत्किंचितही आस्था नाही. दुष्काळग्रस्तांबद्दल प्रेम नाही, धरणाधरणावर पाणी नाही त्याची चिंता नाही. ठिकठिकाणी टॅंकरने प्यायची अवस्था झाली त्याची काळजी नाही. याचा अर्थच चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. महाराष्ट्र असो किंवा इतर राज्य असो बेकायदेशीररित्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय केला जात आहे असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हटले की या वर्षी हवा तेवढा पाऊस पडला नाही. पाऊस नसल्याने राज्याची स्थिती चिंताजनक अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असल्याचे जळगाव शरद पवार यांनी म्हटले आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे आशा निर्माण झाली होती. मात्र आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यासह अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. विमा कंपन्यांमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवी तशी आवश्यक बाजारपेठ उपलब्ध नसल्याचे शरद पवार साहेब म्हणाले. शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात पंधरा दिवसांत २० लोकांनी आत्महत्या केली. शेतकरी कष्ट करणारा, घाम गाळणारा, तो लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवणारा. तो जर आत्महत्येच्या मार्गावर जातो याचा अर्थ त्याच्या पुढची संकटे कमी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिशी सामूहिक शक्ती उभी करण्याची गरज आहे. असे शरद पवार म्हटले.

शरद पवार  पुढे बोलताना म्हणाले की, या वर्षी हवा तेवढा पाऊस पडला नाही. पाऊस नसल्याने राज्याची स्थिती चिंताजनक अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असल्याचे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे आशा निर्माण झाली होती. मात्र आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यासह अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. विमा कंपन्यांमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवी तशी आवश्यक बाजारपेठ उपलब्ध नसल्याचे शरद पवार म्हणाले आहे

शरद पवार पुढे म्हणाले की सध्या देशात नरेंद्र मोदींचं राज्य आहे. त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली या काळात मोदींनी काय केलं? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचं काम केलं. त्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण त्याचबरोबर लोकांनी आपल्या हातात दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी त्यांनी लोकांवर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचं काम केलं. याचा उल्लेख अनिल देशमुखांनीही केला. काहीही संबंध नसताना आमच्या एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला काही महिने तुरुंगात टाकायचं काम त्यांनी केलं. नवाब मलिकांनाही तुरुंगात टाकलं. अनेकांना तुरुंगात टाकलं. लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता येईल यासाठी वापरण्याऐवजी भाजपाने सत्तेचा गैरवापर केला असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे

देशाचे पंतप्रधान मोदी भोपाळला गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका टिप्पणी केली. त्यांनी सांगितलं की हे भ्रष्ट लोक आहे. आमच्याकडे अनेकांची माहिती आहे. माझं मोदीसाहेबांना नम्रतेनं एकच सांगणं आहे. जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध खटला भरा. चौकशी करा. पण तुमचे आरोप खोटे ठरले तर तुम्ही स्वत:ला काय शिक्षा देणार? हेही संपूर्ण देशाला सांगा. खोटे आरोप करणं हे देशाच्या हिताचं नाही. असे देखील यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले आहे

महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर खानदेशाचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत अभिमानाचा असल्याचे दिसून येते. येथे आलो तर बहिणाबाई चौधरी, रान कवी ना. धो. महानोर, सानेगुरुजी, खानदेशाचा इतिहास समृध्द करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. देशाच्या स्वातंत्र्याआधी काँग्रेसची अनेक अधिवेशनं झाले. पण काँग्रेसचं पहिले ग्रामीण भागातलं अधिवेशन खानदेशात झालं. त्यात स्वत: महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, मौलान आझाद आल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे

एकेकाळी संबंध देशात आणि देशाबाहेर एक नंबरची केळी ही खानदेशातून जात होती. तसेच उत्तम शेतीचा आदर्श लोकांना पाहायला मिळत होता. एकप्रकारे दुष्काळाचं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, पाण्याचे साठे कमी झाले. धरणात पाणी नाही, दुहेरी पीक पेरणी केली. पण ती पडली. देशाला एक नंबरचा कापूस देणारा हे राज्य, जिल्हा अडचणीत संकटात आहे. ही स्थिती बदलायची आहे. पण हे चित्र एकदम बदलू शकत नाही. पण आपल्या हातातील सत्ता या लोकांसाठी वापरली तर केला तर हे चित्र नक्की बदलू शकते असेही शरद पवार म्हणाले आहे

शरद पवारनी एक जुना राजकीय प्रसंग सांगताना म्हणाले, १९८४ – ८५ ला राज्यात अशीच अवस्था होती. त्यावेळी आम्ही जळगाव ते नागपूर पायी दिंडी काढली. पहिल्या दिवशी त्यात दहा लोक होते आणि शेवटी दीड लाख लोक नागपूरला अधिवेशनात धडकले. अशी आठवणही शरद पवार साहेब यांनी सांगितली. शेतकरी हा लाचार नाही भीक मागत नाही. तो भेकड नाही. पण तो जे कष्ट करतो त्याची किंमत मागतो. आणि ही किमत जर मिळत नसेल तर तो संघर्ष करतो असा इतिहास खानदेशाने घालून दिला आहे.

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

स्वाभिमानी सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, तुम्हाला न विचारता पोलिस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील तर हे राज्यातील शेंबड्या पोरालाही पटणार नाही. तुम्हाला न विचारता पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल तर त्यासारखी दुसरी गंभीर घटनाच नाही. पोलिसांवर आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांवर सरकारचं नियंत्रण नाही हे यावरून सिद्ध होतं. आज आपण सर्वांनी राजकारणाचा बारकाईने विचार करा. निवडणुकीत डोळसपणाने मतदान करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्यापुढे समर्थ पर्याय ठेवू. सर्वांनी ताकदीने सर्व विधानसभा मतदारसंघ उभारा. जळगाव जिल्ह्यात फार पडझड झालेली नाही. तुम्ही सर्व जण एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच सर्व आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचे निवडून येतील. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात जळगावमध्ये स्वाभिमान सभा होत. आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले यवला आणि बीडमधील सभेपेक्षा आपल्याला जळगावमध्ये जास्त उत्साह जाणवला. शरद पवारसाहेबांचे जळगाव जिल्ह्याशी रुणानुबंध आहेत. आता पुन्हा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडणून आणायचे आहेत. आता आपण व्हिडिओ पाहिलेत त्यामध्ये फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. राष्ट्रवादीशी युती करणार नाही असे सांगितले होते. मात्र आता त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळात बसले आहेत. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे म्हटले होते पण लग्न केले. राज्याला दिलेला एकही शब्द त्यांनी पाळला नाही. आता महाराष्ट्रात, मराठा समाजाला मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. मराठा समाज ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण मागत आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे त्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती करावी. सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

शरद पवारनी 48 खासदारांचं नेतृत्व करावं- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड

स्वाभिमानी सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की केंद्र सरकारने अवघ्या दोन महिन्यांतच सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय फिरविले. मराठा आरक्षणासाठी मात्र सारखे 50 टक्के अटीचे कारण देतात. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यातूनच आम्ही शरद पवार साहेबांना विनंती करतो की तुम्ही 48 खासदारांचे नेतृत्व करा पंतप्रधानांना सांगा की लोकसभेत कायदा आणा आणि मराठ्यांसाठी 16 टक्क्यांचे आरक्षण तुम्ही लोकसभेत आणा असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की भाजपवाले फक्त भांडण लावून देण्याचे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राज्य सरकारला अधिकाऱ्यांची नियुक्ती बदल्यांचे अधिकारी देण्याचा आदेश दिला होता. मात्र केंद्र सरकारने संसदेत वटहुकूम काढत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा प्रकारे फिरवता येतो. असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख बोलताना म्हणाले की, माझ्यावर ईडी, सीबीआय लावली, चौकशी झाली. पण कोर्टात केस गेली तेव्हा आरोप करणाऱ्यांना बोलावले तेव्हा पोलिस आयुक्त आला नाही. शेवटी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह याने आपण केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले असे लिखित स्वरुपात जबाब दिला. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. पण तरीही मला दीड वर्ष जेलमध्ये ठेवले होते. माझ्या सहा वर्षाच्या नातीची सुद्धा चौकशी केली. माझ्या नातीला कॅडबेरीचे आमिष दाखवून अर्धा तास चौकशी केली. माझ्यावर 130 धाडी टाकल्या. पण घाबरलो नाही. मी सांगितले मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव जिल्ह्यामध्ये येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या स्वागत करण्यात आले सभास्थळी जात असताना निघालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये जळगाव मधील नागरिकांनी शरद पवार यांचे स्वागत केले तसेच शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्या संदर्भात अनेक निवेदन देखील शेतकऱ्यांनी पवार साहेब यांना दिले त्यामुळे आज शरद पवार  यांच्या जळगाव आतील आगमनाने जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस बनले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जळगाव मधील स्वाभिमानी सभेदरम्यान भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांनी शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या –