बाबा लगीन! लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून डोकं धरुन बसू नका, घरबसल्या अशा शोधा मुली

हल्ली मुलांना लग्नासाठी (Marriage) मुलगी मिळणे फार कठीण झाले आहे. चांगली नोकरी, घर, शेत असतानाही लग्नासाठी मुली मिळत नसल्याने मुलं रस्त्यावर उतरू लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी तर लग्नासाठी कुणी मुलगी देत नसल्याने जिल्हा कार्यालयावर वाजतगाजत अनोखा मोर्चा काढला होता. तर औरंगाबाद येथील एका तरुणाने लग्नासाठी मुलगी शोधून द्या म्हणून थेट आमदाराला फोन लावला होता. पण जर तुम्हीही लग्नासाठी मुली शोधत असाल तर चिंता करू नका.

डिजिटलायझेशनच्या या युगात घरबसल्या मोबाईलवरही तुम्ही लग्नासाठी योग्य कन्या शोधू शकता. लग्नासाठी मुलींना ऑनलाईन कसा संपर्क साधायचा?, अशा कोणत्या मैट्रिमोनियल वेबसाइट (matrimonial website) आहेत, ज्यावर मुलींचा फोटो, त्यांच्याबद्दलची माहिती आणि फोन नंबर मिळेल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

Shaadi.com
Shaadi.com ही एक अतिशय प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साइट आहे, जिथे तुम्हाला हिंदू धर्मातील मुलींचे फोन नंबर मिळतात. सर्वप्रथम, या वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा, नोंदणी केल्यानंतर तुमचे खाते तयार करा आणि तुमचा संपूर्ण बायोडेटा फिल अप करून तुमचे प्रोफाइल तयार करा, त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतील. अशा प्रकारे या साइटवर तुमच्या आवडत्या मुलींचे तपशील आणि फोन नंबर तुम्ही मिळवू शकता.

jeevansathi.com
लग्नाच्या बदलत्या स्वरूपावर आधारित jeevansathi.com ही एक चांगली वेबसाइट आहे, जिथे तुम्हाला लग्नाशी संबंधित मुलींचे फोन नंबर आणि इतर सर्व तपशील मिळतात. या साइटवर तुम्हाला तुमची प्रोफाइल इत्यादी नोंदणी करून सबमिट करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारच्या मुलींचे फोन नंबर आणि तपशील मिळू लागतील.

Bharat Matrimony.com
Bharat Matrimony.com ही एक लग्नाशी संबंधित वेबसाइट आहे जिथे तुम्हाला तुमच्याशी संबंधित मुलींचे फोन नंबर मिळतात, येथे तुम्हाला मोफत नोंदणी मिळते आणि या वेबसाइटवर तुम्हाला तुमच्यानुसार मुलींचे फोन नंबर आणि इतर तपशील मिळतात.