Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज

Ravindra Dhangekar | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या 57 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

या यादीनुसार, पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता त्यांना दिलेली उमेदवारी ही वादाचा मुद्दा बनली आहे. माजी नगरसेवक आणि जेष्ठ नेते आबा बागुल हे लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला डावलल्याने नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आबा बागुल यांच्या मुलाने what’s app ला एक स्टेट्स ठेवले असून यात पुण्यात निष्ठेची हत्या झाल्याचे यात म्हटले आहे. यामुळे निवडणुकीच्या आधीच कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात