‘पठाण’चा वाद विकोपाला; परमहंस आचार्य म्हणाले, ‘शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळू’

‘पठाण’ (Pathan Movie) या बॉलिवूड चित्रपटाविरोधात संत समाज सातत्याने आंदोलन करत आहे. अशातच अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य  यांनीही मंगळवारी मोठे विधान केले आहे. पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. आमच्या सनातन धर्माचे लोक या बाबत सातत्याने विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला फिल्म जिहादी शाहरुख खान प्रत्यक्षात भेटला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन, असे खळबळजनक विधान परमहंस आचार्य यांनी केले आहे.

एवढेच नाही तर, परमहंस आचार्य पुढे म्हणाले की, जर पठाण चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तर थिएटर्स पेटवून देऊ. जाळून खाक करू, अशी आक्रमक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

“आम्ही आता फक्त शाहरुख खानचे पोस्टर्स जाळले आहेत. मी शाहरुख खानला भेटलो तर त्याला जिवंत जाळून टाकेन. शाहरुख खानच्या या पठाण चित्रपटावर सर्वांनी बहिष्कार टाकावा”, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. याआधी हनुमानगढीचे पुजारी राजू दास यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला होता.