Unmesh Patil | भाजपाने तिकीट कापलेला खासदार उन्मेष पाटील यांनी हाती बांधले शिवबंधन

Unmesh Patil Joins Shivsena UBT | जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज भाजपला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले. त्यांच्याबरोबर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवठाकरे यांनी उन्मेष पाटील यांचे शिवसेनेत स्वागत करून, ‘आपला खरा भगवा आता जळगावमध्ये फडकणार’, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते.

उन्मेष पाटील यांनी मंगळवारी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील (Unmesh Patil ) ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती