भारत जोडो यात्रेत सह्भागी व्हा; कॉंग्रेस नेत्यांचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण

मुंबई – सात नोव्हेंबर पासून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे. सदर यात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सहभागी व्हावे याचे निमंत्रण काँग्रेस शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन दिले .

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन त्यांनाही निमंत्रण दिले या शिष्टमंडळात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी  एच के पाटील विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधान परिषदेतील गटनेते अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप माजी मंत्री प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्रदेश सरचिटणीस रामचंद्र दळवी हे होते.