रशियाचे १ लाखांहून अधिक सैनिक आमच्या भूमीवर, आम्हाला मदत करा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींना विनंती

युक्रेन : रशिया-युक्रेन युद्धाने सध्या जगाला हादरवून सोडले आहे. अशात युक्रेन एकटा पडल्याचे दिसत होते. आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी मोदींकडे मदतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवरून दिली आहे. आतापर्यंत युक्रेनला ठोस मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने युक्रेनची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली होती.

रशियाकडून युक्रेवर सतत हल्ले चढवण्यात येत आहेत. या युद्धात अनेक भारतीय नागरिकही अडकले आहे. या युद्धात रणभूमिवर युक्रेनचे अध्यक्ष खुद्द उतरल्याचेही दिसून आले आहे. रशियाकडून सत्त हल्ले होत असल्याने युक्रेन सध्या बेचिराख झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थित भारत एखादी ठोस भूमिका घेऊन या दहशतीतून युक्रेनला बाहेर काढेल. अशी अपेक्षा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी मोदींकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे एक लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर आहेत. हे हल्लेखोर नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहेत. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे. आक्रमकांना एकत्र येऊन रोखूयात’ अशा आशयाचे ट्विट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी यांनी केले आहे.