सनरायझर्स हैदराबादला मिळाला नवा कॅप्टन! विश्वविजेत्या पॅट कमिन्सला रेकॉर्डब्रेक किंमतीला घेतले विकत

IPL 2024 Auction: आयपीएल २०२४ चा लिलाव दुबईत सुरू असून ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर आयपीएल इतिहासातील आतापर्यंतची सर्वात महागडी बोली लागली. कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत वनडे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना जिंकला होता. त्यामुळे कमिन्सला विकत घेण्यासाठी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा मोठा डाव खेळला. हैदराबादने विक्रमी २०.५ कोटी मोजत कमिन्सला विकत घेतले.

कमिन्सला संघात सामील करत हैदराबादने त्यांची टीम आणखी मजबूत केली आहे. सुरुवातीला ट्रॅव्हिस हेडसारखा धुरंधर हैदाराबादने विकत घेतला. त्यानंतर आता कमिन्सला विकत घेत हैदराबादने कर्णधारपदासाठी नवा पर्याय आणला आहे. पुढील हंगामासाठी हैदाराबाद कमिन्सच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकेल की नाही? हे पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत