IPL 2024 Auction: विश्वचषकात ५७८ धावा चोपणारा फलंदाज चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात

IPL 2024 Auction: दुबईत आयपीएल २०२४च्या हंगामासाठी मिनी लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात ३३३ खेळाडूंवर बोली लागणार आहेत. मल्लिका सागर या भारतीय लिलावकर्त्या यांच्याकडे यंदा लिलावाची सुत्रे देण्यात आली आहेत. 

दरम्यान न्यूझीलंडचा मातब्बर खेळाडू रचिन रविंद्र याला विकत घेण्यात चेन्नई सुपर किंग्जला यश आले. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये रचिन रविंद्रने बॅटने प्रभावी खेळ दाखवला होता. १० डावात फलंदाजी करताना त्याने ५७८ धावा केल्या होत्या. तो विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज राहिला होता. त्याच्या या कामगिरीमुळे लिलावात फ्रँचायझींच्या त्याच्यावर नजरा होत्या. मात्र त्याला अपेक्षेपेक्षा फार कमी किंमत मिळाली. १.८ कोटींच्या किंमतीसह चेन्नईने प्रतिभावान क्रिकेटरला ताफ्यात सामील केले.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत