IPL Auction: फारच स्वस्तात गेले ‘हे’ दोन अष्टपैलू, प्रतिभेच्या तुलनेत मिळाली फार कमी किंमत

IPL Auction: IPL 2024 लिलाव सुरू झाला आहे आणि अनेक खेळाडूंच्या नावावर आधीच बोली लावली गेली आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat CUmmins) हा आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले, पण त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasranga) आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) यांच्यावर खूप कमी बोली लावली गेली, तर त्यांच्या नावावर मोठी बोली अपेक्षित होती.

IPL 2024 च्या लिलावाच्या दुसऱ्या सेटमध्ये, श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला सनरायझर्स हैदराबादने केवळ 1.50 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले, कारण या खेळाडूच्या नावावर इतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्याच्याशिवाय रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने केवळ 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या खेळाडूच्या नावावरही मोठी बोली लागेल, अशी अपेक्षा होती.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत