‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत फटाके फोडले, 7 काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक, पोलिसांनी UAPA लावला

Jammu-Kashmir News: जम्मू- काश्मीरमधील गांडरबेल येथे असलेल्या शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (SKUAST) सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष केला आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका बिगर काश्मिरी विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तेव्हा या सात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहात आनंदोत्सव साजरा केला होता. यामुळे तो व त्याचे इतर साथीदार घाबरले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात फटाके फोडल्याबद्दलही आक्षेप घेतला. पण काश्मिरी विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरूच ठेवला. तक्रारीनंतर पोलिसांनी नुकतीच या सात काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहातून अटक केली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी तौकीर भट, मोहसीन फारुक वानी, आसिफ गुलजार वॉर, ओमर नजीर दार, सय्यद खालिद बुखारी, समीर रशीद मीर आणि उबेद अहमद अशी अटक केलेल्यांची ओळख पटवली आहे. UAPA अंतर्गत अटक केलेल्या लोकांना जामीन मिळणे कठीण आहे. या कलमान्वये एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला कनिष्ठ न्यायालयांतून जामीन मिळणे कठीण असते.

तक्रार करणारा विद्यार्थी हा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. या विद्यापीठात फारच कमी बाह्य विद्यार्थी असून या बाह्य विद्यार्थ्यांमध्ये तक्रारदाराचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थी जम्मू-काश्मीरमधील आहेत. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाला तेव्हा श्रीनगरच्या अनेक भागात फटाक्यांची आतषबाजी झाल्याची माहिती समोर आली.अनेक व्हिडिओ आणि फोटोही समोर आले.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा