ग्लोबल लीडर्समध्ये पंतप्रधान मोदींचा जलवा! २२ देशाच्या दिग्गजांना मागे टाकत अव्वलस्थानी विराजमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची फॅन फॉलोविंग पाहायला मिळत आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ताज्या सर्वेक्षणात पीएम मोदींना 78 टक्के मान्यता मिळाली आहे.

‘मॉर्निंग कन्सल्ट’चे हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची मान्यता रेटिंग 68 टक्के आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचे रेटिंग 58% आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनीचे रेटिंग 52 टक्के आहे.

सहाव्या क्रमांकावर जो बायडेन

ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत 50 टक्के मान्यता रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत ‘महासत्ता’ अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे रेटिंग 40 टक्के आहे. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नाव येते. त्याचे रेटिंग 40 टक्के आहे.

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या यादीत 11व्या स्थानावर आहेत. त्यांचे रेटिंग 29 टक्के आहे.