पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Pakistan Election: पाकिस्तानमधील (Pakistan) सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्याने पाकिस्तानचं राजकीय भवितव्य अनिश्चित आहे. अनेक दावेदारांनी मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ-पीटीआय-समर्थित उमेदवार सर्वाधिक जागांसह आघाडीवर असून त्यापाठोपाठ पाकिस्तान (Pakistan) मुस्लिम लीग-नवाझ, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट- पाकिस्तान आहेत. अपक्षांना आतापर्यंत 101 जागा मिळाल्या आहेत. तर 93 जागा पीटीआय-समर्थित उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

पीएमएल-एन ला 75, पीपीपी ला 54 आणि एमक्यूएम पक्षाला 17 जागा मिळाल्या आहेत. पीएमएल-एन नेत्यांनी पीपीपी आणि एमक्यूएम-पी यांच्याशी युती करण्याच्या अटींवर चर्चा सुरू केल्याने, युती सरकारच्या स्थापनेबाबत प्राथमिक सल्लामसलत करण्यात आली. निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत इतर अनेक पक्षांसह पीटीआयही निकालांच्या विरोधात निदर्शनं करत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी