स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सध्या मोठा संघर्ष सुरु असून आता भावनिक राजकारण शरद पवार यांच्या गटाकडून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? असा प्रश्न विचारत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत त्यांना विचारलं असता “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला. तो पक्ष घेतला. तसंच उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला. स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे.

श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनासाठी १४ वर्षांच्या वनवासाला गेले. आपल्यावर हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आहेत. आज ते आपला पक्षही घेऊन गेले आणि चिन्हही घेऊन गेले. आता लोक विचारतात नवं चिन्ह कसं पोहचवणार? चिन्ह आपण पोहचवू काळजी करु नका. आपण नव्याने पक्ष उभा करु, नवीन चिन्ह घेऊन नव्या जोमाने उभे राहू. आमची सगळ्यात मोठी ताकद इमानदारी आहे. ते सगळं घेऊन जातील पण इमानदारी कशी काय नेतील? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी