Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया

Test Cricket एकेकाळी भारताच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख मानला जाणारा उमेश यादव (Umesh Yadav) याने आता केवळ कसोटी संघातील (Test Cricket ) स्थानच गमावले नाही तर वेगवान गोलंदाजांच्या यादीतही तो खूप मागे गेला आहे. मात्र, तो राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप मेहनत घेत आहे. रणजी ट्रॉफीच्या 4 सामन्यात 19 विकेट्स घेऊन उमेश निवडकर्त्यांना आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तो अजूनही सामना विजेता आहे आणि भारताच्या कसोटी संघाच्या वेगवान फळीला मजबूत बनवू शकतो. परंतु इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करताना निवडकर्त्यांनी उमेशच्या नावाचा विचारही केला नाही.

संघाच्या घोषणेनंतर विदर्भाच्या वेगवान गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यावरून असे दिसून येते की तो अजूनही भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

नागपूरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने 2021-23 हंगामातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या कालावधीत, त्याने 9 सामन्यांमध्ये 33.72 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 22 बळी घेतले, ज्यामध्ये डिसेंबर 2022 मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध घेतलेल्या 4 विकेट्सचाही समावेश आहे. असे असतानाही उमेश यादववर निवड समितीद्वारे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याने इंस्टा स्टोरीद्वारे आपण अजूनही पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असल्याचे संकेत दिले. ‘पुस्तकांवर धूळ जमा झाल्याने त्यातील कथा संपत नाहीत’, अशी लक्षवेधी इंस्टा स्टोरी त्याने लावली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी