Nawaz Sharif | पाकिस्तानातून मोठी बातमी, नवाझ शरीफ यांचा मानसेरा मतदारसंघातून पराभव

Pakistan Election: नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा मानसेरा मतदारसंघातून (Mansehra Constituency) पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार शहजादा गस्तसाप यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. शहजादा गस्तसाप यांना ७४,७१३ मते मिळाली, तर नवाज यांना ६३,०५४ मतांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू आहे.

मानसेरा हा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचा बालेकिल्ला मानला जातो. असे असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, मनसेरा व्यतिरिक्त नवाझ शरीफ यांनी लाहोरमधून देखील निवडणूक लढवली आहे आता तिकडे काय होतेय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार 154 जागांवर आघाडीवर आहेत, तर नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पीएमएल (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी प्रत्येकी 47 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्षांचे उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान यांनी दावा केला आहे की त्यांचा पक्ष सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ