Sophia Leone | पॉर्न फिल्म स्टार सोफिया लिओनचे वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निधन, अपार्टमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती

Adult Film Star Sophia Leone Died | ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. 26 वर्षांची ॲडल्ट स्टार सोफिया लिओन आता या जगात नाही. ती मियामीची रहिवासी होती. आठवडाभरापूर्वी ती तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती.

सोफिया लिओनीच्या (Sophia Leone) मृत्यूमुळे अडल्ट चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी तिच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच अवाक केले आहे. सोफियाचे वडील माईक रोमेरो यांनी GoFundMe द्वारे निवेदन जारी करून तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माईक रोमेरो म्हणतात की सोफिया केवळ एक चांगली मुलगीच नाही तर एक चांगली नात, बहीण आणि मित्र देखील होती.

माईक म्हणाले की, तिच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या मृत्यूची बातमी सांगायची आहे. 1 मार्च रोजी सोफिया तिच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली होती. स्थानिक पोलिसांनी या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सोफियाचा मृत्यू का आणि कसा झाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणे बाकी आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य