करीमा आपा : भंगारवाल्याची बायको  ‘लेडी डॉन ऑफ मुंबई’  कशी बनली ?

मुंबई – मुंबई अंडरवर्ल्डमध्ये माफिया तर होतेच, पण काही माफिया क्वीनही (MafiaQueen) होत्या. करीमा आपाच्या नावासह जेनाबाई दारुवाली, अर्चना शर्मा, सपना दीदी (Jenabai Daruwali, Archana Sharma, Sapna Didi) अशा नावांचा यात समावेश होतो. यापैकी आज आपण  करीमा आपाबाबत (Karima Apa) जाणून घेणार आहोत. असं सांगितलं जाते की जेव्हा ती मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जायची  तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा लोक नमस्कार करायला उभे राहत होते.

मुंबईची लेडी डॉन (Lady Don) म्हणवल्या जाणाऱ्या करीमा आपाचा नवरा कबाडीवाला म्हणजेच भंगारवाला होता. करीमाचे खरे नाव करीमा मुजीब शाह शेख होते पण लोक तिला करीमा आपा, आपा आणि मम्मी म्हणून हाक मारायचे. त्यामागचे कारण ती करत असलेले काम होते. मुंबईच्या रस्त्यावर सोडून दिलेल्या मुलांना आधार देणे आणि नंतर त्यांना गुन्ह्यांच्या जगात टॉप क्लास शार्प शूटर किंवा गुंड बनवणे आणि संपूर्ण परिसरात  दहशत निर्माण करणे हे करिमाचे काम होते. ती शेकडो मुलांची आई होती.

मिडिया रिपोर्टनुसार, करिमाचा नवरा भलेही भंगाराचा व्यापारी असेल पण काही वर्षांतच ती करोडपती झाली होती. ती तिच्या याच शार्प शूटर किंवा गुंड यांच्या आधारावर झोपडपट्टी परिसरात अनेक बेकायदेशीर झोपड्या निर्माण करून मग त्या विकायची. एवढेच नाही तर त्याच्यावर शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचाही तिच्यावर आरोप होता.  करीमाने मुंबईसारख्या शहरात शेकडो बेकायदा झोपड्या बांधल्या आणि त्या विकल्या असं सांगितलं जाते.

2005 मध्ये त्याच्यावर अनधिकृत झोपडी बांधणे, विक्री करणे आणि पाडणे यासाठी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय, पंतनगर पोलिसांनी तिला एकदा तडीपार म्हणून घोषित केले होते. करीमा आपावर 2014 साली झोपडपट्टीच्या वादातून एका महिलेची हत्या केल्याचा आरोपही होता. मुंबईसारख्या शहरात अवघ्या सहा-सात वर्षांत  करीमाने करोडोंची संपत्ती कमावली. डझनभर चाळी आणि सुमारे अर्धा डझन घरांची ती मालकीण होती. यानंतर 2020 मध्ये करीमाला अटक करण्यात आली.