Ravindra Waikar | ठाकरे गटाला खिंडार, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

Ravindra Waikar | लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय दिग्गज नेते रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर (Ravindra Waikar ) यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य