अश्लील व्हिडीओ : ‘त्या’ कीर्तनकाराची नावासह तृप्ती देसाईंनी केली गृहमंत्र्यांकडे तक्रार

पुणे – राज्यभरात एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘नको तसला’ व्हिडीओ व्हायरल (Aurangabad Viral Video)  झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात.

व्हिडिओतील किर्तनकार महाराज (Kirtankar Maharaj)  हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर (Youtube) मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र, त्यांचे नको त्या अवस्थेतील दोन व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे .

दरम्यान, या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई चांगल्याच आक्रमक झाल्या असून या महाराजांवर कारवाई करावी अशी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठा मान आहे. राज्यात अनेक कीर्तनकार समाजप्रबोधनाचे काम करतात परंतु अलीकडे त्याला बाजारूपणाचे स्वरूप आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील भागवताचार्य, अखिल भारतीय वारकरी मंडळ ता.अध्यक्ष, बाळकृष्ण महाराज रामभाऊ मोगल आणि आणखी एक महिला या दोघांनीही विवाहबाह्य संबंध सहमतीने प्रस्थापित करून संभोग करतानाचा पॉर्न व्हिडिओ (Porn Video)  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असा अश्लील व्हिडिओ हजारो लोकांच्या मोबाईलमध्ये व्हायरल झाला ही गंभीर बाब आहे.

खाजगी आयुष्यातील चार भिंतींच्या आतमधील झालेली नैसर्गिक क्रिया जरी एकमेकांच्या संमतीने झाली असेल तरी जाणीवपूर्वक सोशल नेटवर्कवर व्हायरल केलेली दिसते आहे. एक सामाजिक भान व सोशल नेटवर्कचा दुरुपयोग कसा होतो त्याचे हे उदाहरण असुन सोशल नेटवर्क तरुण पिढीला वाचवायचं असेल तर सरकारने कंट्रोल आणणे आवश्यक आहे समाजाला उपदेश करणारे किंवा समाजाचे प्रबोधन करणारेच जर असे गुन्हा करणार असतील तर कडक कारवाई आवश्यक आहे.
कीर्तनकारांना लोक देवासमान मानत असतात, त्यांच्या पाया पडत असतात त्यांच्याकडून असे कृत्य अपेक्षित नाही. या कीर्तनकारावर सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A आणि IPC 292 अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती. असं देसाई यांनी म्हटले आहे.