दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

Vidya Chavan: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांची आज पत्रकार परिषद पार पडली. दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे फटाके फोडायला ज्यांना आनंद वाटतो फटाके फोडून ज्यांना आनंद मिळतो त्यांनी नक्कीच फटाके फोडावे. परंतु फटाके कसे आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे फटाके किती धूर करतात आवाज किती करतात जास्त आवाज करणारे जास्त प्रदूषण करणारे फटाके फोडणे टाळावं असे विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

विद्याताई चव्हाण पुढे म्हणाल्या की, सुप्रीम कोर्ट देखील सांगत आहे की मुंबईची प्रदूषणाची टक्केवारी मोठे प्रमाणावर वाढली आहे. मुंबईमध्ये कधीही प्रदूषण नव्हतं आणि ते आता झालं आहे. तरी ही फटाके का? फोडायचे आहे असा प्रश्न विद्याताई चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. सण अनेक प्रकारे साजरा केला जातो. सण साजरे करण्याचे अनेक प्रकार आहेत. दिवाळी साजरी करण्याचे अनेक मार्ग आहेत. फराळ बनवणे, एकमेकांना भेटणं, प्रार्थना करणं असे आनेक प्रकार सण साजरी करण्यासाठी आपण वापरू शकतो. अशाप्रकारे आनंदाने उत्साहाने दिवाळी साजरी करू शकतो. असे विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

वायू प्रदूषण (Air Pollution) आणि ध्वनी प्रदूषण (Sound Pollution) कशा पद्धतीने कमी करता येईल याचा नागरिकांनी विचार करावा. प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा विचार करावा. तसेच फटाक्यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम हा लहान मुलांवर होतो लहान मुले फटाके उडवतात. लहान मुलांना त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते त्याची देखिल दखल आपणं घेणं गरजेच आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आपण फटाक्यांवर स्वतःहून बंदी घातली पाहिजे हायकोर्टाने सांगण्याची गरज लागता कामा नये असेही विद्याताई चव्हाण म्हणाल्या आहेत

काल पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षातर्फे मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले यावरून असं लक्षात येतं की भाजपला शिस्त नाही. सध्या मुंबईमध्ये प्रदूषणाची टक्केवारी वाढत असताना भाजप सारखा सत्तेत असणारा पक्ष जर प्रदूषणामध्ये भर घालत असेल तर ते कितपत योग्य आहे. भाजपने फटाके फोडले असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरंतर भाजप पक्षाला कोणतही तारतम्य उरलेलं नाही. असं विद्याताई चव्हाण म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट – मंत्री छगन भुजबळ

इच्छुकांनो होशियार : आगामी महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर!

शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला- आज जे काही झालं ते…