Pune Accident Update | अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन उघड

Pune Accident Update | पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche car Accident ) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला  छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

दरम्यान, आता या प्रकरणात (Pune Accident Update) आणखी एक गंभीर माहिती समोर आली आहे.  कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झालीय…सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर आलंय.

सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे. यात सुरेंद्र कुमार अग्रवालनं थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप