भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा उंचावली भारताची मान, डायमंड लीगमध्ये जिंकले सुवर्णपदक

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा आपल्या खेळाची ताकद दाखवली आहे. नीरजने लुझने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League) सुवर्णपदक जिंकले आहे. डायमंड लीगचे हे त्याचे एकूण चौथे सुवर्णपदक आहे. अलीकडेच त्याने दोहा डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक पटकावले होते.

25 वर्षीय नीरज चोप्रा लुझने डायमंड लीगमध्ये अपेक्षित सुरुवात करण्यात अपयशी ठरला. त्याच्या पहिल्या थ्रोला फाऊल म्हटले गेले. त्यानंतर त्याने 83.51 आणि 85.04 मीटरवर भाला फेकला. पण तरीही तो त्याच्या सर्वोत्तमाच्या जवळ नव्हता. अशा स्थितीत नीरजने अधिक ताकद लावली, पण त्याचा चौथा थ्रो पुन्हा योग्य ठरला नाही. म्हणजे फाऊल झाला.

जर्मनीच्या ज्युलियन वेबरने नीरज चोप्राला कडवी झुंज दिली, पण त्याला सुवर्णपदक जिंकता आले नाही. वेबरने शेवटच्या सहाव्या थ्रोमध्ये भाला 87.03 मीटर फेकले, पण त्याला नीरजने मागे टाकले. झेक रिपब्लिकच्या जाकुब वडलेजचे याला कांस्यपदक मिळाले. त्याने 86.13 मीटरवर भाला फेकला.