Pramod Bhangire | ससून रुग्णालयातील गैर प्रकारांची तातडीने चौकशी करा

Pramod Bhangire | मागील काही दिवसांपासून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील अनेक गैरप्रकार समाज माध्यमांद्वारे उघडकीस आले. रुग्णालयात गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळले जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. ससून हा भ्रष्ट व्यवस्थेचे प्रतिक बनत चालले असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रुग्णांची शस्त्रक्रिया सरकारी योजनेमार्फत मोफत झालेले असताना सुद्धा रुग्णांकडून पैसे घेतले गेले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य आणायला सांगितले गेले, खाजगी औषधालयांमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्याची जबरदस्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून तब्बल २४ हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांद्वारे समोर आला व असे अनेक गैरप्रकार रुग्णालयात घडत असल्याचे दाखले देणारे पुरावे समोर आले. या घडलेल्या गैरप्रकारांवर प्रश्न विचारल्यास रुग्णालयाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

याच घटनांचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Bhangire) यांनी रुग्णालयाला पत्र लिहून रुग्णालयात घडत असलेल्या गैरप्रकारांबद्दल विचारणा केली व गोरगरीब रुग्णांवर अन्याय करून त्यांना त्रास देणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी वजा सूचना दिल्या व ते न केल्यास शिवसेनेकडून रुग्णालयाविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप