‘गोंड राजाने राज्य केलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे’

 चंद्रपूर – गोंड राजाने राज्य केलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मात्र या जिल्ह्याचा खरा मालक असलेला आदिवासी बांधव आजही आपल्या मुलभूत हक्कासांठी संघर्ष करणे ही चिंतेसह चिंतनाची बाब आहे. आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. वेळोवेळी समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे असून समाज प्रबोधनासह इतर कार्यक्रम घेणे त्यांना सोईचे व्हावे या करिता आपण चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात त्यांच्या हक्काचे पाच सामाजिक सभागृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने आज शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी चांदागडचे श्रीमंत गोंडराजे विरेंद्रशाह आश्राम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, संतोषसिंह रावत, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष गजानन जुमनाके, जनसेवा गोडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धिरज शेडमाके, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्यान संस्थाचे अध्यक्ष लोकेश मडावी, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधूकर उईके, क्षयरोग व कृष्ठरोग तज्ञ, जनरल सर्जन डॉ. श्रीनिवास सुरपाम, आफ्रोट संघटनेचे प्रबंधक भारतीय खाद्य निगम तथा संस्थापक सचिव नंदकिशोर कोडापे, अॅड. प्रियाशी टेकाम आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि चंद्रपूर हा आदिवासी संस्कृती जोपासणारा जिल्हा आहे. चंद्रपूरात आदिवासी समाजाच्या वास्तू आजही गोंडकालीन राजवटीची साक्ष देत उभ्या आहेत. मात्र बदलत्या काळात या वास्तूंकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामूळे याचे जतन करने ही काळाची गरज असून समाजातील पूढा-र्यांनी यात पूढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.

गोंडराजांनी चंद्रपूर जिल्ह्यावर जवळपास 500 वर्ष राज्य केले. त्यांच्या राजवटीत त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान न्याय दिला. समाजिक एक्क्यासाठी विविध धार्मीक स्थळे समाजापयोगी योजना शाळा व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यात त्यामूळे या सर्व गोष्टींसह आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रालय चंद्रपूरात साकार व्हावे या करीता मी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बार्टी या संस्थेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन व्हावे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे गोंडी साहित्य अध्यासन केंद्र तयार व्हावे यासाठीही संबधीत विभागाशी पाठपूरावा करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

आदिवासी समाजासाठी शासनानेही विविध योजना लागू केल्या आहे. या योजना समाजातील शेवटच्या गरजू पर्यत पोहचविण्याची गरज आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही येत्या काळात आदिवासी समाजाच्या योजना समाजापर्यंत पोहचाव्यात या करिता मोहिम सुरु केल्या जाणार आहे. यात समाजानेही सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थी हा आता शिक्षण क्षेत्रातही यशस्वी झेप घेत आहे. मात्र अपू-या सोई सुविधांमूळे उच्च शिक्षणात त्याला अडचणी येत असल्याची कल्पना मला आहे. या करिता आदिवासी समाजासाठी आपण 50 लक्ष रुपयातून सूसज्ज अभ्यासीका तयार करणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना त्यांनी केली. या अधिवेशनात आ. जोरगेवार यांचा आदिवासी समाजाचे मानचिन्ह असलेले मोरपंख व पिवळा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.